सावधान : PMRDA कडून शिरूर तालुक्यात दोन ठिकाणी अनधिकृत बांधकामावर हातोडा

Written by

शिरुर : दि. 16 जून 2022
रवींद्र खुडे विभागीय संपादक
आज शुक्रवार दि. 16 जून 2022 रोजी मौजे रांजणगाव गट नंबर 1111 व 1134 येथे, पीएमआरडीए च्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागामार्फत, वाणिज्य स्वरूपाचे सुमारे 4500 चौरस फुट व मौजे शिक्रापूर येथिल गट नंबर 811 व 812 येथे, साधारणपणे 5500 चौरस फुटाचे बांधकाम, असे एकूण 10,000 चौरस फुटाचे वाणिज्य वापराकरिता बांधण्यात आलेले अनधिकृत बांधकाम व अनधिकृत हॉटेल, पी एम आर डी ए च्या अनधिकृत बांधकाम निष्कासन विभागमार्फत पाडण्यात आले.

एकाच दिवशी पीएमआरडीए च्या अनधिकृत बांधकाम विभागामार्फत दोन ठिकाणी यशस्वीपणे निष्कासन कारवाई करण्यात आलेली आहे. सदर निष्कासन कारवाई ही तीन पोकलेनच्या सहाय्याने करण्यात आली आहे. कारवाईच्या वेळी पी एम आर डी ए चे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते व स्थानिक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. परवानगी शिवाय कोणतेही अनधिकृत बांधकाम करण्यात येऊ नये, असे आवाहन नियंत्रक तथा सहआयुक्त अनधिकृत बांधकाम विभाग बन्सी गवळी यांनी जनतेला केले आहे. तसेच सदर अनधिकृत बांधकाम धारकाकडून, अनधिकृत बांधकाम निष्कासन खर्च वसूल केला जाईल असेही सांगण्यात आले आहे.
 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares