साडेपाच महिन्याच्या कार्यक्रमात २०० आंब्याच्या रोपांचे वाटप

Written by

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
१४ मार्च २०२२
वडगाव आनंद
भुजबळ कुटुंबीयांचा अनोखा उपक्रम
वडगाव आनंद (ता.जुन्नर) येथील संतोष भुजबळ यांच्या आईच्या साडेपाच महीन्याच्या कार्यक्रमात २०० केशर आंब्यांच्या रोपांचे वाटप करण्यात आले.या निमित्ताने हभप विशाल महाराज हाडवळे यांचा प्रवचन चा कार्यकम पार पड्ला .संतोष भुजबळ,भारती वऱ्हाडी,संध्या होगे,स्वाती अमूप या चार भावंडांनी सध्याच्या काळाची गरज ओळखून आई शकुंतला भुजबळ यांच्या साडेपाच महिन्याच्या कार्यक्रमात रोपांचे वाटप करून अनोख्या पद्धतीने कार्यक्रम साजरा केल्याने महाराजांनी भुजबळ कुटुंबियांचे कौतुक केले.
जिल्हा परिषद शाळेत ही रोपांची लागवड
तसेच गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत काही आंब्याच्या कलमी झाडांची रोप लावली. याप्रसंगी वारकरी संप्रदायाचे भुषण नाना महाराज चाळक, ग्रामपंचायत सदस्या वैशाली देवकर, शाळेतील सर्व शिक्षक तसेच सामाजिक कार्यकर्ते डि.बी.वाळूंज,वडगाव आंनद व आळे गावचे ग्रामस्थ, नातेवाईक उपस्थित होते.
 
Your email address will not be published. Required fields are marked *





source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares