सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि झिरो वेस्ट प्रकल्प राबविल्याबद्दल तब्बल ५५ लाखांची मिळाली सवलत

Written by

०३ नोव्हेंबर २०२२
पिंपरी
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि झिरो वेस्ट प्रकल्प राबविल्याबद्दल शहरातील १० हजार ८५३ सदनिका धारकांना तब्बल ५५ लाख रुपयांची सवलत देण्यात आल्याची माहिती कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी दिली. तसेच शहरातील जास्तीत जास्त सोसायटीधारकांनी पर्यावरण पूरक सोसायट्या करून सवलत योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही देशमुख यांनी केले.
शहरात पाच लाख ८२ हजार मिळकतींची नोंद आहे. चालू आर्थिक वर्षांत सुमारे चारशे कोटी रुपये कराचा भरणा केला आहे. शहरातील ४२ मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि झिरो वेस्ट प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या सोसायट्यांमध्ये १० हजार ८५३ सदनिका आहेत. या सर्व सदनिकाधारकांना तब्बल ५५ लाखांची कर सवलत देण्यात आली आहे. या कर सवलतीमधून सोसायट्यांना त्यांचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि झिरो वेस्ट प्रकल्प राबविण्यासाठी २५ ते ५० टक्के रक्कम उभी राहिली.
 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares