०९ डिसेंबर २०२२
महाप्रबोधन यात्रा म्हणजे दुसऱ्याच्या लग्नात जिलेबी वाटपाचा कार्यक्रम आहे अशी टीका शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. या टीकेला सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिल आहे.
अंधारे म्हणाल्या, काय कमाल आहे महाप्रबोधन यात्रा ही आम्ही सुरू केलेली, आमच्या पक्षाचा कार्यक्रम आहे. शिंदे गटाची अडचण अशी आहे की, त्यांनी प्रचंड पैसा पेरला, प्रचंड माणसं फोडली. पण एवढी सगळी माणसं फोडूनसुद्धा अजेंडावर काम करायला माणूस नाही. म्हणजे सगळा गाव मामाचा आणि एक नाही कामाचा अशी गत त्यांची झाली आहे अशा शब्दांत अंधारे यांनी हल्लाबोल केला.
Your email address will not be published. Required fields are marked *
Article Tags:
news