२४ डिसेंबर २०२२
संजय राऊत यांनी आज भाजप नेते आशिष शेलारांना लक्ष्य केले होते. भाजप आमदार दुतोंडी साप आहेत. दोन्ही बाजुने वळवळतात, अशी घणाघाती टीका संजय राऊतांनी केली होती. त्याला आशिष शेलारांनी प्रत्युत्तर दिले आहे.
संजय राऊत रोज सकाळी उठून बोलघेवडेपणा करतात. मात्र, जनता त्यांच्यासोबत नाही. संजय राऊत आता रामरक्षा म्हणा, रावणरक्षा म्हणणे बंद करा, अशा शब्दांत भाजप नेते आशिष शेलार यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तुम्ही सोडलेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताटाखालचं मांजर झालात. पण स्वाभिमानानं जे आमदार बाहेर पडले त्याची मिरची संजय राऊत यांना लागली आहे. त्यामुळे स्वाभिमान, मर्द, मराठी, हिंदुत्व या भाषा ना संजय राऊत आता तुम्हाला झेपत, ना तुम्हाला शोभत, ते बंद करा.असंही आशिष शेलार म्हणाले.
Your email address will not be published.

Article Tags:
news