मंगेश शेळके
१६ डिसेंबर २०२२
ओझर
अष्टविनायकांतील मुख्य स्थान असलेल्या श्री क्षेत्र ओझर येथे विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष मा.गणेशभाऊ कवडे,व विश्वस्त मंडळ यांच्या संकल्पनेतून श्री क्षेत्र ओझर संकष्टी चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर शासकीय डॉक्टर सेवा सुरु होत आहे. या बाबत डॉ कैलास बावसकर डेप्युटी डायरेक्टर हेल्थ सर्विस यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव येथील सरकारी रूग्णालयाच्या सहकार्याने श्री क्षेत्र ओझर येथे सरकारी डॉक्टर सेवेत रुजू होणार आहे.
बावसकर यांच्या माध्यमातून हि सुविधा सुरु झाल्याने ओझर व परिसरातील रुग्णांना मोठ्या प्रमाणात फायदा भेटणार आहे. दैनंदिन जीवन जगत असताना आरोग्य देखील महत्वाचे आहे.या बाबात महत्व बावसकर यांनी सांगितले.श्री विघ्नहर गणरायाच्या जन्मभूमीत श्रद्धा ठेवून काम करण्याचे त्यांनी सांगितले.
श्री क्षेत्र ओझर मध्ये श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट वेगाने प्रगती करत असताना देवस्थान ट्रस्ट चालवत असलेल्या मोफत दवाखान्याचे डॉक्टरांनी विशेष कौतुक केले.या प्रसंगी आरोग्य अधिकारी सौ.वर्षा गुंजाळ देखील उपस्थित होत्या.श्री क्षेत्र ओझर येथे सुरु होण्याऱ्या या उपक्रमाचे डॉ कैलास बावसकर यांच्या शुभास्ते नारळ वाढवून उद्घाटन करण्यात आले.या प्रसंगी देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष गणेशभाऊ कवडे,सचिव दशरथ मांडे,विश्वस्त रंगनाथ रवळे,आनंदराव मांडे,श्रीराम पंडित, मंगेश मांडे, व्यवस्थापक गणेश टेंभेकर संतोष कवडे यांची उपस्थिती होती.
Your email address will not be published. Required fields are marked *

Article Tags:
news