श्रीमती सी के गोयल माध्यमिक विद्यालयातील सन २००३ वर्षातील १० वी च्या विद्यार्थ्यांची पुन्हा २० वर्षांनी भरली शाळा

Written by

रोहित खर्गे
विभागीय संपादक
११ जून २०२२
चिंचवड
पुन्हा मला एकदा शाळेत जायचंय असा अट्टाहास धरत, श्रीमती चंद्रकला किशोरीलाल गोयल माध्यमिक विद्यालयातील सन २००३ च्या इयत्ता १० वी च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा तो वर्ग भरविला. शाळेतील शिस्त, मागच्या बाकावर केलेली मस्ती आणि विद्यार्थ्यांना चूक केल्याबद्दल शिक्षकांनी केलेली शिक्षा अश्या भरगच्च आठवणींची शिदोरी घेऊन तब्बल २० वर्षानी एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच शिक्षकांची अनेक वर्षानंतरची आदरयुक्त भावनिक भेट सर्वांना सुखावून गेली.
श्रीमती सी के गोयल माध्यमिक विद्यालय मधील मार्च २००३ मध्ये इयत्ता १० वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी स्नेहमेळावा घेऊन शिक्षकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. शाळेची पहिली घंटा, शिक्षकांचे एक साथ नमस्ते करून केलेले अभिवादन, राष्ट्रगीत प्रार्थना आणि शिक्षण सम्राट अण्णासाहेब जाधव यांना श्रद्धांजली देत कार्यक्रमाची सुरुवात झाली. आज प्रत्येक जन वेग वेगळ्या क्षेत्रात काम करत आहे मोठ्या हुद्यावर आहेत. पण शाळेच्या ओढीने सर्वांना आज एकत्र आणले आणि एक उनाड दीवस जगायला भाग पाडले.
शाळेतील शिक्षक वृंद यांचा यावेळी सत्कार करून सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित शिक्षक मुख्याध्यापक बाळाराम पाटील सर ,उपमुख्यध्यापक अहिरे सर ,भालेराव सर, पठारे सर, देवरे सर, सुरवसे सर, ढवळे सर, गुराळकर सर, क्षीरसागर मॅडम, चौधरी मॅडम, कोल्हे मॅडम, बेडेकर मॅडम, झेंडे मॅडम, मोमीन मॅडम, कदम मॅडम आदी शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शब्बीर मोमीन सर यांनी उत्तमरित्या पार पाडले. तसेच फेसबुक व व्हाट्सअपच्या जमान्यात 20 वर्षानंतर सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आणि उत्तम कार्यक्रमाचे नियोजन डॉ. परवेझ शिकलगार, रवींद्र जांभूळकर, सुशील आहिरे, राहुल साळवे, अनिल वाळके, विजय गोपाळे, कविता नवघरे, जितेंद्र गवळी यांनी नियोजनबद्ध पार पाडले.
यावेळी उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनी अमित वाणी, रमेश चौधरी, धीरज पवार, श्याम कळसकर, जमील मकानदार, सरिता गवळी, शुभांगी भुंडे, राणी ढाकरके, सोनम जांभुलकर, रोहित गांधीले, योगेश भेंडाळे, सागर नेरुळकर, जयंत सुर्यवंशी, संकेत काळे आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते .शाळा आली म्हणजे मधली सुट्टी ही आलीच. यावेळी सर्वांनी चवीष्ट जेवनाचा पुरेपुर आनंद घेतला. विद्यार्थ्यांच्या मनोगतसोबतच, शिक्षकांनीही आपले मनोगत व्यक्त करत जुण्या आठवनींना उजाळा दीला व विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. वंदेमातरम ने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ परवेझ शिकलगार यांनी केले.
 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares