मंगेश शेळके
बातमी प्रतिनिधी
१९ मार्च २०२२
ओझर
होळी च्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन ला विराचा पाडवा हा सण साजरा केला जातो. धुलिवंदनाच्या दिवशी आनंदोत्सव असणारा हा सोहळा या गावांमध्ये दरवर्षी साजरा केला जातो.या उत्सवाला जवळजवळ ४०० ते ५०० वर्षांची परंपरा आहे. या गावातील मांडे मंडळातर्फे हा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो. येथील सतोबा देवस्थान अतिशय जागृत आणि समाजाचे श्रद्धास्थान असल्याकारणाने लहान-मोठे सर्व जण विराचा वेश परिधान करून , गावामध्ये मोठी मिरवणूक होऊन ,भगवंताला स्मरण करून , जवळ घेऊन नाचवले जाते.वीर पुरुषाचे स्मरण , आपल्या घराण्याचा मूळ पुरुष व यामुळे मूळ पुरुषाचे स्मरण व मूळ पुरुषाची पूजा म्हणजेच वीराचा पाडवा होय.
प्रत्येक घराण्याचा मूळ पुरुष म्हणजेच वीर होय व यामुळे मूळ पुरुषाचा उत्सव म्हणजेच विराचा पाडवा होय. हा विराचा पाडवा या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय पारंपारिक पद्धतीने , उत्साहात साजरा केला जातो. ही या गावातील अतिशय जुनी अशी परंपरा आहे. कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यानंतर याहीवर्षी हा वीराचा पाडवा अतिशय मंगलमय , उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. तडम – ताशांच्या आवाजात विरांचा पदन्यास पाहण्यासाठी ओझरकरांनी मोठी गर्दी केली होती . होळीच्या दिवशी दुर्गुणांची होळी करून , पूर्वजांचा मान सन्मान करण्यासाठी धुलिवंदनाच्या दिवशी वीर नाचवून त्यांचा मानपान करण्यात येतो.
विघ्नहर मंदिराच्या प्रांगणात ताशांच्या तालावर झालेला विरांचा पदन्यास पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ व ओझरकरांनी या ठिकाणी गर्दी केल्याचे चित्र दिसून येत होते . गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आजच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या काळातही तेवढ्याच आनंदाने व भक्तिभावाने साजरी केली जाते . सण व संस्कृती टिकवण्यासाठी पारंपारिक पद्धतीत थोड्याफार प्रमाणात जरी बदल झाला असला तरी त्याचा उत्साह मात्र आजही टिकून असल्याचे चित्र या ठिकाणी दिसून येत होते.
Your email address will not be published. Required fields are marked *
Article Tags:
news