१५ डिसेंबर २०२२
श्रद्धा वालकर या तरुणीच्या हत्येनं संपूर्ण देशाला हादरवून टाकलं आहे. पोलिसांकडून या हत्याकांडाचा तपास वेगाने सुरू असून आरोपी आफताबविरुद्ध पुरावे शोधत आहेत. श्रध्दा वालकर प्रकरणात सध्या एक मोठी अपडेट समोर आली आहे.
श्रद्धा केसमध्ये आरोपी आफताब पुनावालाने जंगलात फेकलेल्या हाडांचा डीएनए हा श्रद्धा वालकरच्या वडिलांशी जुळला आहे. ती श्रद्धाचीच असल्याचं समोर आलं आहे. जंगलात सापडलेल्या हाडांची फॉरेन्सीक चाचणी करण्यात आल होती. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून हाडांची डीएनए आणि श्रद्धाच्या वडिलांचे डीएनए जुळले आहेत. हा पुरावा श्रद्धा मर्डर केसमध्ये महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या पुराव्याच्या आधारे आरोपी आफताब पुनावाला याला जास्तीतजास्त शिक्षा होऊ शकते.
Your email address will not be published. Required fields are marked *
Article Tags:
news