शिवा संघटना आळंदी शहर अध्यक्ष पदी सदाशिव साखरे यांची निवड

Written by

अतुल परदेशी
मुख्य संपादक
२५ मार्च २०२२
आळंदी
बुधवार दिनांक २३ मार्च २०२२ रोजी बोधेगाव, जिल्हा अहमदनगर येथे शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना आयोजीत मेळावा व भव्य शाखा उदघाटन समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ष.ब्र.प.१०८ श्री पंडीताराध्य शिवाचार्य महाराज वडांग‌‌ळीकर मठ संस्थान नाशिक व उदघाटक म्हणुन शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे हे होते.
प्रमुख उपस्थिती मध्ये जहागीरदार मठ संस्थानचे उत्तराधिकारी ष.ब्र.प.१०८ श्री विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मानुरकर, शिवा संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस उमाकांत अप्पा शेटे, राज्य उपाध्यक्ष शैलेश जकापुरे, राज्य उपाध्यक्ष सुनील वाडकर, औरंगाबाद जिल्हा प्रमुख वीरभद्र वसापुरे, पुणे जिल्हा अध्यक्ष प्रशांत हत्ते, पिंपरी चिंचवड अध्यक्ष अनिल बोचरे व राज्यभरातून आलेले हजारो शिवा मावळे व समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये शिवा संघटनेच्या नूतन शाखेचा उदघाटन समारंभ अतिशय उत्साहपूर्ण वातावरण जल्लोषात पार पडला. या मेळाव्यात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शिवा संघटना आळंदी शहर अध्यक्ष पदी सदाशिव साखरे यांची निवड करून शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले…

याप्रसंगी सदाशिव साखरे यांनी बोलताना आळंदीसह आसपासच्या परिसरातील समाज बांधवांना शिवा संघटना गेल्या २६ वर्षापासून समाजासाठी करीत असलेल्या सामाजिक कार्याची माहिती देऊन आद्य जगद्गुरु रेणुकाचार्य, पंचाचार्य, महात्मा बसवेश्वर,धर्मगुरू, माता-पिता व प्रा.मनोहर धोंडे यांनी दिलेले संस्कार, आचार, विचार व मार्गदर्शन यांचे पालन करुण समाजातील सर्व जाती पोटजातींना एकत्रित घेऊन कार्य करण्याचे अभिवचन सदाशिव साखरे यांनी दिले. यावेळी धार्मिक, सामाजिक व राजकीय अशा विविध विषयावर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे राष्ट्रीय सरचिटणीस उमाकांत अप्पा शेटे, व धर्मगुरूंनी वीरशैव लिंगायत समाजाला सविस्तर मार्गदर्शन केले.
 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares