शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून कर्नाटकच्या बसेसना फासले काळे

Written by

०६ डिसेंबर २०२२
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळला आहे. बेबेळगावात कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक केली आहे. या दगफेकीचे पडसाद आता पुण्यात उमटले आहेत. पुण्यात शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकच्या बसेसना काळे फासले आहे. पुण्यातील स्वारगेट भागात उभ्या असलेल्या कर्नाटकच्या बसेसना शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले आहे.
यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. परंतु, कार्यकर्ते खूपच आक्रमक झाले होते. कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ घोषणा देत यावेळी बसेसना काळा आणि भगवा रंग लावण्यात आला. बसेसवर कन्नड भाषेत लिहण्यात आलेला मजकूर काळ्या आणि भगव्या रंगाने पुसून टाकण्यात आला. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात झटापट झाली.
 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares