पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या कॉलेज ऑफ फार्मसी हडपसर महाविद्यालयामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ “मीराकी” २०२१- २२ व शिवजयंती उत्सव संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सिने व टीव्ही अभिनेते अक्षय वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुरेश अण्णा घुले तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर सरचिटणीस विक्रम दादा शेवाळे, पुणे महानगरपालिकेचे स्वीकृत नगरसेविका संजीवनी जाधव, स्वीकृत नगरसेवक अविनाश काळे, महाविद्यालयाचे पदवी विभागाचे प्राचार्य डॉक्टर अशोक भोसले सर, पदविका विभागाचे प्राचार्य कोतवाल सर, शेवाळवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच अक्षय शेवाळे त्याचबरोबर बाळासाहेब शेवाळे, प्रीतम शेवाळे, अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे प्राचार्य पंडित शेळके तसेच मराठी सिने कलाकार व निर्माते कुणाल देशमुख हे मान्यवर उपस्थित होते. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात हा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. प्राचार्या अश्विनी शेवाळे यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे , विद्यार्थ्यांचे व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

Article Tags:
news