शिनोली येथे जश्ने ईद ए मिलन कार्यक्रम जिल्हा परिषदेचे मा.उपाध्यक्ष विवेकदादा वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

Written by

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
११ मे २०२२
शिनोली
युवा उद्योजक शफीभाई मोमीन यांनी पोल्ट्री व्यवसायातून शेतकर्यांना आर्थिक ताकद देण्यासाठी नेहमीच मदत केलेली आहे. असे गौरोद्गार जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी व्यक्त केले.
शिनोली ता. आंबेगाव येथे जश्ने ईद ए मिलन या कार्यक्रमाचे आयोजन युवा उद्योजक शफीभाई मोमीन व बादशाहभाई इनामदार मंचरवाले यांच्या संकल्पनेतून सर्व हिंदू मुस्लिम बंधू-भगिनींना एकत्र बोलावून स्नेह भोजन व सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रकाशराव घोलप, सुभाषराव तळपे, जनाबाई उगले, भगवान बोऱ्हाडे, मधुकर बोऱ्हाडे, प्रदीप दौंडकर, भरत फदाले, पुरुषोत्तम फदाले, आनंद राक्षे, महेश शेजवळ, राजूभाई मोमीन, इमत्याज मोमीन, पप्पू भाई इनामदार, बाबूभाई मणियार, सनिदभाई इनामदार, रमीज मोमीन, बाबूभाई इनामदार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी विवेक वळसे पाटील म्हणाले की शिनोली परिसरातील तरुण उद्योजक शफीभाई मोमीन यांनी पोल्ट्री व्यवसायातून अनेक लोकांना कशी रोज रोटी मिळेल असा प्रयत्न करतात. पोल्ट्री व्यावसायाला अनेक अडचणी असतात कधी ही डगमून न जाणारी व्यक्ती शफीभाई म्हणजे महाराष्ट्रातील पोल्ट्री व्यावसायातील आंबेगावतील एक तरुण सहकारी इतकी मोठी भरारी घेतो म्हणजे निश्चित आम्हाला सार्थ अभिमान आहे. ह.भ.प. पांडूरंग महाराज येवले ,शिनोली येथील सेन्ट्रल बँक ऑफ इंडीयाचे सेवानिवृत्त अधिकारी सुनील दामले , उद्योजक अमित बेनके , उद्योजक प्रमोद हिंगे, पांडुरंग सांडभोर,घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांची भाषणे झाली . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश बोऱ्हाडे यांनी केले तर आभार हुसेन शेख यांनी मानले.
 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares