२० डिसेंबर २०२२
राज्यभरात ग्रामपंचायत निवडणूक निकालाचा जल्लोष सुरु आहे. त्यातच मुक्ताईनगरमधील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर एकनाथ खडसे यांनी एकहाती वर्चस्व मिळवल्याचं चित्र आहे. या ठिकाणी एकूण १३ पैकी १२ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. जिल्हा दूध संघात मोठा पराभवानंतर ग्रामपंचायत आपल्या ताब्यात ठेवण्यात खडसे यांना यश आले आहे.
निकालानंतर खडसे प्रतिक्रिया देताना म्हणाले की, भाजप शिंदे गटाला या निवडणुकीत जनतेने नाकारल आहे. शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा हा मतदारसंघ असताना एकही ग्रामपंचायतीवर त्यांना विजय मिळवता आलेला नाही. या निकालातून जनता ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभी असल्याचे स्पष्ट झालं आहे.
जळगाव १२२ ग्रामपंचायत निकाल –
राष्ट्रवादी काँग्रेस : ५५
भाजप : ३३
शिंदे गट : १६
काँग्रेस : १०
उद्धव ठाकरे गट : ४
इतर : ४
Your email address will not be published. Required fields are marked *

Article Tags:
news