१० डिसेंबर २०२२
महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न अधिकाधिक चिघळत चालला आहे. त्यावर राज्यातील विरोधीपक्ष आक्रमकपणे बोलताना दिसत आहे. तर सत्ताधाऱ्यांकडून मात्र याबाबत मौन बाळगण्यात आलं आहे. त्यावर खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका अशी दिसत आहे आमचं ते आमचं आणि तुमचं तेही आमचंच. ते आक्रमकपणे त्यांची बाजू मांडत आहे. पण आमचे मुख्यमंत्री कुठे आहेत? ते काहीही का बोलत नाहीत? त्यांच्या तोंडाला कुलुप का? कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलतात त्याच्याशी महाराष्ट्राला पडलेला नाही. परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बोम्मई यांना कशाप्रकारे उत्तर देतात? मुख्यमंत्री या लढ्यात उतरले आहेत की नाहीत कुठे आहेत, हा प्रश्न आहे. कर्नाटकच्या प्रश्नावरती महाराष्ट्राला मुख्यमंत्र्यांनी तोंड उघडलेला नाही. काल देखील आमचे खासदार हे अमित शहा यांना भेटले आहेत. मिंदे सरकारचे खासदार यावरती गप्प बसलेले आहेत, असं राऊत म्हणालेत.
शिंदेगटाची निशाणी ढाल तलवार नाही. कुलूप पाहिजे. त्यांच्या कुलपाची चावी दिल्लीला आहेत. त्यांच्यात बोलण्याची हिंमत नाही. महाराष्ट्राचा स्वाभिनासाठी पक्ष सोडला मग आता हा स्वाभिमान कुठे आहे? महाराष्ट्राचं अवहेलना पदोपदी करावी. महाराष्ट्राचा अपमान करावा, यासाठी संपूर्णपणे षडयंत्र आहे, असं राऊत म्हणालेत.
Your email address will not be published. Required fields are marked *

Article Tags:
news