२६ डिसेंबर २०२२
भाजपाचे ज्येष्ठ नेते खासदार गिरीश बापट यांच्यावर मागील काही दिवसांपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजपाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी रुग्णलयात जाऊन गिरीश बापटांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली. यानंतर शरद पवार आणि किरीट सोमय्या यांनीरुग्णालयाच्या आवारातील भिंतीवरील लता मंगेशकर यांच्या चित्रांची पाहणी केली. शरद पवार आणि किरीट सोमय्या यांच्यात फार कमी वेळ चर्चा झाली. त्यानंतर सोमय्यांनी शरद पवारांच्या वागणुकीचं आणि त्यांच्या स्वभावाचं कौतुक केलं.
किरीट सोमय्या म्हणाले की, शरद पवार यांचे एक वेगळे स्थान आहे. आम्ही त्यांचा नेहमीच आदर करतो. प्रत्येक राजकारणी अनेक चांगली कामं करत असतो. शरद पवारांनी देखील अनेक चांगली कामं केली आहेत. शरद पवार यांच्याकडून सर्व राजकारण्यांना विशिष्ट गुण घेण्यासारखे आहेत. आमचा पक्ष जरी वेगळा असला तरी शरद पवार हे गिरीश बापट यांना भेटण्यास आले. आपल्या देशाची आणि महाराष्ट्राची हीच तर खरी संस्कृती आहे, असंही ते म्हणाले. लवकर बरे व्हा आणि संसदेत या, असं शरद पवार यांनी गिरीश बापटांना म्हणाल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलं.
Your email address will not be published.

Article Tags:
news