शरद पवारांनी उद्धव ठाकरेंवर जादुटोणा केला, बावनकुळेंच्या टीकेवर संजय राऊतांचं प्रत्युत्तर

Written by

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१२ नोव्हेंबर २०२२

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला जोरदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. टीका करणाऱ्यांनी आपलं कर्तुत्व काय याचा आधी विचार करावा, असा हल्लाबोल राऊतांनी केला. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंवर जादुटोणा केला अशी टिका बावनकुळे यांनी केली होती.
संजय राऊत म्हणाले, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करून स्वतःकडे लक्ष वेधून घेणं भाजपाच्या नेत्यांचं काम झालंय. याचा अर्थ ते स्वतःच्या कामावर उभे नाहीत. त्यांना आमच्यावर चिखलफेक करून प्रसिद्धी मिळवायची असेल, तर त्यांनी हे थांबवायला हवं.शरद पवार व उद्धव ठाकरे हे देशाचे प्रमुख नेते आहेत. अशी चिखलफेक करणाऱ्यांनी याचं भान ठेवावं. शरद पवार व उद्धव ठाकरेंवर टीका करताना त्यांनी आपलं कर्तुत्व काय आहे याचा विचार करावा,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.
 
Your email address will not be published. Required fields are marked *





source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares