१५ डिसेंबर २०२२
महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमावादावर तोडगा काढण्यासाठी काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यामुळे आता सीमावादावर पडदा पडण्याची आशा व्यक्त केली जात आहे.सध्या महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचातींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे अनेक राजकीय नेते विविध भागांचा दौरा करत आहेत. त्याच धर्तीवर आणि सीमाभागातील मराठी भाषिकांच्या भावना जाणून घेण्यासाठी शंभूराज देसाई सीमाभागाचा दौरा करणार आहेत.
महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमाप्रश्नामुळे निर्माण झालेला वाद निवळण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी बैठक घेऊन काही तास उलटत नाहीत तोपर्यंत आपण बेळगाव सीमेवर जाणार असल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी जाहीर केलं आहे. बेळगावपासून अगदी जवळ असलेल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदगड तालुक्यातील शिनोळी गावात ते शुक्रवारी (१६ डिसेंबर) जाणार आहेत .शंभूराज देसाई बेळगाव सीमेवरच्या शिनोळी गावात जाणार आहेत. त्यामुळे एकमेकांच्या सीमांचं उल्लंघन करायचं नाही हा अमित शाहांनी घालून दिलेला नियम ते पाळणार आहेत.
Your email address will not be published. Required fields are marked *

Article Tags:
news