विरोधकांच्या टीकेवर उदय सामंत यांचं प्रत्युत्तर

Written by

आपला आवाज न्यूज नेटवर्क
२८ ऑक्टोबर २०२२
सी-२९५ या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एयरबस प्रकल्प’ महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्यानंतर महाविकास आघाडीकडून शिंदे सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. विरोधकांच्या या टीकेला राज्याची उद्योमंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
एयरबर प्रकल्पावरून जो गाजावाजा करण्यात येत आहे. मला आर्श्चय वाटते आहे की, एका ट्वीटवरून जयंत पाटील असतील किंवा इतर वरिष्ठ नेते असतील, अशा प्रकारची प्रतिक्रिया देत आहेत. हे आमचं दुर्भाग्य आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रात होण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, असं मी बोललो होतो. यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्नही केले. मात्र, पुढे अशी माहिती आली की २१ सप्टेंबर २०२० ला या प्रकल्पाचा एमओयू झाला होता. त्यामुळे केवळ आरोप प्रत्यारोपाचे राजकारण करू नये. विरोधात असताना बैठका सकारात्मक झाल्या असं म्हणणं खूप सोप्प असतं अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
 
Your email address will not be published. Required fields are marked *

Shares