विमाननगर येथे अमली पदार्थ विक्रेता अटकेत; ५२ ग्रॅम कोकेन जप्त

Written by

पुणे : अमली पदार्थ विरोधी पथकाने गुरुवारी विमाननगर येथे एकाला अटक करून त्याच्याकडून ५२ ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. बाजारपेठेत याची किंमत १५ लाख रुपये आहे.
अख्तर नुरलहोदा शेख (वय 34 धानोरी, मुळ-बिहार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. विमाननगर परिसरात एक व्यक्ती स्वीफ्ट कारमधून अमली पदार्थाची करता असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. पोलिसांनी पाळत ठेवली असता आरोपी स्वीफ्ट कार (एमएच 12 केजे 2934) मध्ये बसून अमली पदार्थाची विक्री करत असल्याचे त्यांना आढळले. कारची झडती घेतली असता त्यात 52 ग्रॅम 120 मिलीग्रॅम कोकेन, 5 हजार रुपये रोख रक्कम, 10 हजार 500 रुपयांचे दोन मोबाईल फोन असा ऐवज आढळून आला. पोलिसांनी या सर्व मुद्देमालासह स्विफ्ट कार जप्त केली आहे.
वर्षभरात सव्वा पाच कोटीचे अमली पदार्थ जप्त
अमली पदार्थ विरोधी पथकाने जानेवारी 2022 पासून ते डिसेंबर 2022 या काळात 5 कोटी 36 लाख 13 हजार 250 रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले असून त्यामध्ये 70 लाख1 हजार 20 रुपयांचा गांजा,9 लाख 91 हजार 290 रुपयांचे अफिम, 1 कोटी 84 लाख 54 हजार 600 रुपयांचे एम डी (मेफेड्रोन) 2 कोटी 64 लाख 96 हजार 650 रुपयांचे कोकेन, 58 हजार 350 रुपयांचे ब्रोऊन शुगर, 1 लाख 10 हजार रुपयांचे एम डी एम ए, 1 लाख 87 हजार 720 रुपयांचे चरस जप्त केले आहे.
Your email address will not be published. Required fields are marked *





source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares