वाहतूक पोलिसांची १९५ बुलेटस्वारांवर कारवाई

Written by

१५ नोव्हेंबर २०२२
पिंपरी
कर्णकर्कश्श आवाज करणाऱ्या बुलेट सायलेन्सरवर कारवाई करण्यासाठी पिंपरी – चिंचवड वाहतूक पोलिसांकडून सातत्याने कारवाई करण्यात येत आहे . अशाच प्रकारे शुक्रवारी दि . ११ विशेष मोहीम राबवून १ ९ ५ बुलेटस्वारांवर कारवाई केली . सायलेन्सर बदलून कानठळ्या बसविणारा आवाज काढणाऱ्या या वाहन चालकांवर एक लाख ९९ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला . पिंपरी – चिंचवड पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून ही कारवाई झाली शहरातील ध्वनिप्रदूषण नियंत्रणात राहण्यासाठी प्रशासनाकडून विविध पिंपरी – चिंचवड मात्र , फटाका बेशिस्त उपाययोजना केल्या जात आहेत . त्यासाठी पोलिसांकडूनही फटाके वाजविणे , डीजे यावर निर्बंध लागू केले आहेत सायलेन्सरचा वाजविण्याचे प्रकार बुलेटस्वारांकडून सुरू आहेत . अशा बुलेटस्वारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे . दिवाळीच्या काळातही अशा बुलेटस्वारांवर मोठी कारवाई केली होती . त्यानंतर , पुन्हा विशेष मोहीम राबवून बुलेटस्वारांना वाहतूक पोलिसांनी दणका दिला.
फेरफार करणे भोवले दुचाकी , तसेच चारचाकी वाहनांची सजावट करताना ,काही जणांकडून वाहनांच्या मूळ स्वरूपात बदल केला जातो. यासाठी काही पार्ट्स बदलून फेरफार केला जातो . त्यामुळे वाहनाच्या मूळ रचनेत बदल होतो . परिणामी , ध्वनी व वायुप्रदूषण होऊ शकते . त्यामुळे वाहनाच्या मूळ रचनेत बदल करणे हा कायद्याने गुन्हा ठरतो . अशा वाहन चालकांवर कारवाई केली जाते.
 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares