रोहित खर्गे
विभागीय संपादक
२८ नोव्हेंबर २०२२
पिंपरी
पर्यावरण संवर्धन आणि इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाची जनजागृती करण्यासाठी आयोजित केलेल्या भारतातील सर्वात मोठ्या ‘‘रिव्हर सायक्लोथॉन’’ साठी पर्यावरण प्रेमी, नागरिक आणि स्वयंसेवी संस्था- संघटनांनी तुफान प्रतिसाद दिला. सुमारे २५ हजार हून अधिक नागरिकांनी सायकल रॅलीमध्ये सहभाग घेतला.
पिंपरी-चिंचवडमधील ‘रिव्हर सायक्लोथॉन’ला ‘रेकॉर्ड ब्रेक’ गर्दी
भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, अविरत श्रमदान, सायकल मित्र अशा विविध संस्था-संघटनांसह शाळा-महाविद्यालयांच्या पुढाकाराने ‘‘रिव्हर सायक्लोथॉन- २०२२’’ चे आयोजन करण्यात आले. या रॅलीचा शुभारंभ राज्याचे उच्च शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे, ट्रिपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव, ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ सायकलपटू प्रिती म्हस्के, पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल, आपला आवाजचे मुख्य संपादक अतुलसिह परदेशी आदी उपस्थित होते. अविरत श्रमदान संस्था आणि संयोजन समितीचे डॉ. निलेश लोंढे, दिगंबर जोशी, शिवराज लांडगे, डॉ. आनंद पिसे, बापू शिंदे, सुनील बेळगावकर, डॉ. अश्विनी वानखेडे, रविकिरण केसरकर, सीमा शादबार, तृतीय पंथी प्रतिनिधी गायत्री थेरगावकर यांच्यासह विविध संस्था-संघटनांच्या प्रतिनिधी रॅली यशस्वी करण्यात पुढाकार घेतला.
उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अभिनेता प्रवीण तरडेंसह मान्यवरांची उपस्थिती
अविरत श्रमदान व संयोजन समितीचे प्रमुख डॉ. निलेश लोंढे म्हणाले की, महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून आणि सर्व संस्था-संघटनांच्या पुढाकाराने एकूण २० हजार १०३ नागरिकांनी प्रत्यक्ष नोंदणी केली होती. रॅलीच्या ठिकाणी ३ हजारहून अधिक नागरिकांनी नोंदणी केली. त्यामुळे सुमारे २५ हजारहून नागरिक या ऐतिहासिक रॅलीत सहभागी झाले. गेल्या पाé

Article Tags:
news