वंदे भारत ट्रेनचा पुन्हा एकदा अपघात

Written by

आपला आवाज न्यूज नेटवर्क
२९ ऑक्टोबर २०२२

वंदे भारत ट्रेनचा गुजरातमधील वलसाडमध्ये अपघात झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर १ ऑक्टोबरपासून वंदे भारत एक्स्प्रेस प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. मात्र, पहिल्या महिन्याभरातच तीन वेळा या एक्स्प्रेसला अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. प्रत्येकवेळी समोर आलेल्या जनावरांना धडक दिल्याने वंदे भारत एक्स्प्रेसचं नुकसान झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
गुजरातमध्ये सेमी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेसला अपघात झाल्यामुळे तिच्या पुढच्या भागाचं नुकसान झालं. वलसाडच्या अतुल रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला, एक गाय अचानक रेल्वेच्या समोर आल्यामुळे ही धडक झाली. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकारानंतर जवळपास अर्धा तास वंदे भारत एक्स्प्रेस अतुल रेल्वे स्थानकावर उभी ठेवण्यात आली होती. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले.
 
Your email address will not be published. Required fields

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *