लोड शेडिंग बंद करा अन्यथा महावितरण कार्यालयास टाळे लावू

Written by

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
१३ एप्रिल २०२२
आळेफाटा
आळे गावात चालुअसलेले लोड शेडिंग दोन दिवसांत बंद न केल्यास महावितरणच्या कार्यालयास टाळे लावण्यात येईल असा कडक इशारा ग्रामस्थांनी महावीतरणास दिला आहे. आळे (ता.जुन्नर) गावातील कोळवाडी,संतवाडी वस्तीमधील ग्रामस्थांच्या वतीने महावितरण विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.यावेळी ग्रामस्थांणी आक्रमक भूमिका घेत महावितरण च्या अधिका-यांणा धारेवर धरले.आळे या गावामधील घरगुती विज ग्राहकांना पुरेश्या दाबाने विद्युत पुरवठा मिळत नसुन आळे,कोळवाडी या गावांची लोकसंख्या दहा ते पंधरा हजारांहून अधिक असुन पुरेश्या दाबाने विद्युत पुरवठा मिळत नसल्याने शेतक-यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. असे महावितरण कंपनील दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी पंचायत समीतीचे सदस्य जिवन शिंदे यांणी सांगीतले की या ठिकाणी असलेल्या महावितरण कंपनीसाठी गावाने १९९२ साली ग्रामसभेत ठराव घेऊन जवळपास ४ हेक्टर (८९ आर ) जागा दिलेली आहे व आळे गावाला २४ तास विज देण्यात येईल असा करार झालेला होता परंतु असे असताणा देखील गावात मोठ्या प्रमाणावर लोड शेडिंग चालु असुन यामुळे शेतक-यांचे खुप नुकसान होत आहे. तसेच सरपंच काळे यांणी माहीती देताणा सांगीतले की सध्या कडक असा उन्हाळा चालु असुन घरातील सिंगल फेज विज पुरवठा देखील बंद असल्याने शेतकऱ्यांणा कडबा कुट्टी गाईचे दुध काढणे मशीन साठी लाईट लागते .मात्र विज पुरवठा बंद असल्याने दुध गवळयांच्या विज गेल्यावर सरासरी १०० ते १५० लिटर दुध हाताने काढणे शक्य होत नसल्याने पर्यायाने दुध शिल्लक राहिल्याने नुकसान होत आहे. तर आळे या ठिकाणी असलेले नियोजित कार्यालय ओतुर येथे सुरू असुन ते आळे याच ठिकाणी आणावे अशी मागणी केली.
याप्रसंगी पंचायत समीतीचे सदस्य जिवन शिंदे,आळे गावचे सरपंच प्रितम काळे,धनंजय काळे, सुधीर लाड,मंगेश कु-हाडे,दिगंबर घोडेकर, उमेश शिंदे,अरूण हुलवळे,गणेश गुंजाळ, बाजीराव लाड,बाजीराव कु-हाडे, महावितरण कंपनीचे सहाय्यकअभियंता आर.पी.गांधी,महावितरण कंपनीचे गुणवत्ता नियंत्रण अधिकारी रूषिकेश बनसोडे आदी मान्यंवर ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares