३० नोव्हेंबर २०२२
पुणे
मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून तीस हजार रुपयाची लाच घेताना, एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. दिपक प्रल्हाद क्षिरसागर, (वय 34, नेमणूक – गुन्हे शाखा युनीट- 3), खाजगी वेक्ती सिमोन अविनाश साळवी, (वय 27) अशी दोघांची नावे आहेत.
तक्रारदाराच्या भावाला मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात आरोपी न करून अटक न करण्यासाठी पोलिस कर्मचारी क्षीरसागर याने लाचेची मागणी केली होती. त्यांनी याबाबत एसीबीकडे तक्रार नोंदवली होती. तक्रारीची पडताळणी केली असता लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने सापळा लावून सिमोन साळवी यांच्यामार्फत तीस हजार रुपयाची लाच घेताना दोघांना पकडण्यात आले.
Your email address will not be published. Required fields are marked *

Article Tags:
news