२१ डिसेंबर २०२२
महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूची चर्चा प्रचंड रंगली. भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर आणि ठाकरे गट नेते आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. हा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरून शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत बोलताना आदित्य ठाकरे यांच्यार गंभीर आरोप केले आहेत.
राहुल शेवाळे म्हणाले, एयूचा विषय खूप गंभीर आहे. एयू म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असा आहे. बिहार पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. रिया चक्रवर्तीच्या फोनवर ४४ कॉल ‘एयू’ नावाने होते. या प्रकरणी सीबीआय, बिहार पोलिस आणि मुंबई पोलिसांचा तपास वेगवेगळा आहे. त्यामुळे याची माहिती लोकांना मिळाली पाहिजे.
सुशांतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय तपास कुठपर्यंत पोहोचलाय? याप्रकरणी सीबीआय अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचलीय का? सुशांतच्या शरीरावर मारहाण केल्याचे निशाण होते का? सुशांत आणि त्याची माजी मॅनेजर दिशा सालियनची फोनवर झालेल्या बातचितचा तपास झालाय का? १० जून २०२० ला दोन व्यक्ती सुशांत सिंह राजपूतच्या घराबाहेर आले होते का? त्याचा लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्ऱॉनिक वस्तू हिसकावण्यात आल्या का? रिया चक्रवर्ती महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय नेत्याच्या संपर्कात होती का? हे खरंय का?, असे प्रश्न राहुल शेवाळे यांनी लोकसभेत उपस्थित केले.
Your email address will not be published.

Article Tags:
news