राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची पिंपरी महापालिकेला नोटीस

Written by

१४ नोव्हेंबर २०२२
पिंपरी
पिंपरी महापालिकेच्या आरोग्य विभागातील सफाई कर्मचाऱ्यांना त्यांनी सार्वजनिक सुटीच्या दिवशी केलेल्या कामाचा अतिरिक्त मेहनताना केवळ तीन क्षेत्रीय कार्यालयांकडून देण्यात आला आहे. अन्य पाच कार्यालयांकडून हा मेहनताना देण्यात आलेला नाही. याबाबत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने महापालिकेला नोटीस बजावली आहे. तसेच, येत्या ७ दिवसांत याबाबतची माहिती आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. महापालिका आरोग्य विभागातील वर्ग-३ आणि वर्ग-४ च्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी शासन निर्णयानुसार महात्मा गांधी जयंती ते घटस्थापना या कालावधीत सार्वजनिक सुटीच्या दिवशी केलेल्या कामाचे जादा वेतन दिवाळीपूर्वी एकत्रितरित्या अदा करण्याची तरतूद आहे.
त्यानुसार क, फ आणि ह क्षेत्रीय कार्यालयांतर्गत संबंधित कर्मचार्यांना अतिरिक्त मेहनताना देण्यात आला आहे. मात्र, अ, ब, ड, इ आणि ग या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये नियमांची अंमलबजावणी झाली नसल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत अॅड. सागर चरण यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेऊन आयोगाने याबाबत चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares