१७ डिसेंबर २०२२
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि अन्य भाजप नेत्यांचे वादग्रस्त वक्तव्यांविरोधात महाविकास आघाडीकडून राज्य सरकारविरोधात आज महामोर्चाचे काढण्यात येणार आहे. यात महाविकास आघाडी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. यादरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह बडे नेते महामोर्चात सहभागी होणार आहे. परंतु, कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण हे सहभागी होणार नाही. यात आता राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडेंचंही नाव सामील झाले आहे. महाविकास आघाडीच्या महामोर्चाला आज उपस्थित राहणार नाहीत. यासंबंधीचे माहिती धनंजय मुंडे यांनी ट्विटरवरुन दिली आहे.
आजच्या महाविकास आघाडीच्या मोर्चाला माझा संपूर्ण पाठिंबा आहे. माझ्या जन्मगाव नाथरासह मतदारसंघातील बहुतांश गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका असल्याने मला मोर्चात सहभागी होता येत नाही. आमच्या परळी मतदारसंघाच्या वतीने माजी आमदार संजय दौंड व अनेक पदाधिकारी हे उपस्थित आहेत. आम्ही कोणत्याही महापुरुषांचा अवमान खपवुन घेतला जाणार नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे, असं ट्विट धनंजय मुंडे यांनी केलं आहे.
Your email address will not be published. Required fields are marked *

Article Tags:
news