राष्ट्रवादीच्या तीनही विधानसभा अध्यक्षपदी तीन मातब्बर भूमिपुत्रांची वर्णी

Written by

रोहित खर्गे
विभागीय संपादक
०६ मे २०२२
पिंपरी
नुकतेच न्यायालयाने निवडणूक आयोगाला आदेश देऊन निवडणुकांचा कार्यकाळ जाहीर करण्यास सांगितले. हा निर्णय आलेनंतर राज्यातील महत्वाची असणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका राष्ट्रवादी च्या हातातून गेल्याचे शल्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांना असल्याने ही महानगरपालिका पुन्हा ताब्यात घेण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार हे सांगण्यास भविष्यकाराची गरज नाही. अगोदर शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्याबरोबरच महिला शहाराध्यक्षासह युवक शहराध्यक्ष यांच्यासह कार्याध्यक्ष आणि महत्वाची पदे बदलली. आता त्याचाच एक भाग म्हणजे आज तीनही विधानसभा अध्यक्षांच्या नियुक्तीचे पत्र मुंबईत अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे माजी नगरसेवक मयुर कालाटे, विक्रांत लांडे उपस्थित होते.

भोसरी विधानसभा अध्यक्षपदी माजी नगरसेवक पंकज भालेकर, पिंपरी विधानसभा अध्यक्षपदी माजी नगरसेवक शाम लांडे तर चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक विनोद नढे या तीनही गाववाल्या भूमीपुत्रांची वर्णी लागली आहे.
शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी या निवडीत लक्ष घातल्याचे समजते. त्यांना हवे असलेले स्वातंत्र्य अजितदादांनी दिले आहे. विशेष बाब म्हणजे या नियुक्ती केलेल्या तीनही माजी नगरसेवकांचा आपापल्या मतदार संघात दांडगा जनसंपर्क असल्याने त्याचा फायदा पक्ष मजबुतीसाठी होणार असल्याचे जाणकार सांगतात.
 
Your email address will not be published. Required fields are marked *





source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares