राज ठाकरे आमच्याबरोबर आले तर स्वागतच – अब्दुल सत्तार

Written by

१६ डिसेंबर २०२२
मनसे प्रमुख राज ठाकरे आणि भाजपा-शिंदे गटाची राजकीय जवळीक वाढली आहे. त्यामुळे मनसे महायुतीत येण्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र,अद्याप अधिकृत कोणतीही घोषणा झालेली नाही. राज ठाकरेंनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दारुगोळा साठवून ठेवलेला बरा, ज्यावेळी गरज लागेल तेव्हा हा दारुगोळा बाहेर काढेल, असं वक्तव्य केलं. यावर अब्दुल सत्तार यांना मनसेही महायुतीत सहभागी होणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सत्तारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
अब्दुल सत्तार म्हणाले, राज ठाकरे राज्यातील प्रमुख पुढाऱ्यांपैकी एक आहेत. त्यामुळे त्यांचा निर्णय ते घेतील. राज ठाकरे आमच्याबरोबर आले तर त्यांचं स्वागतच आहे.आमच्या सर्व नेत्यांनी त्यांना सन्मानाने आमच्यासोबत येण्याचं आवाहन केलं आहे. पण शेवटी निर्णय राज ठाकरे यांचा आहे. ते काय निर्णय घेतील हे कुणीही सांगू शकत नाही, असं सत्तार म्हणाले.
 
Your email address will not be published. Required fields are marked *





source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares