०६ डिसेंबर २०२२
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणखी चिघळला आहे. बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या सहा ट्रकवर दगडफेक करत तोडफोड करण्यात आली आहे. यावर आमदार रोहित पवार यांनी कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे. ट्विट करत कर्नाटक सरकारला इशारा देत असतांना शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.
‘कन्नड रक्षण वेदिके’चे कार्यकर्ते महाराष्ट्राचे ट्रक फोडून धुडगूस घालत असताना, हवेत राजकीय गोळीबार करणारे भाजपचे नेते कुठं आहेत? निवडणूक डोळ्यापुढं ठेवून कर्नाटकातील भाजप सरकार आक्रमक होतंय, तर महाराष्ट्रातील भाजपप्रणित सरकार मात्र आपली अस्मिता विसरुन मिळमिळीत भूमिका घेतंय.
संवादातून मार्ग काढता येतो, पण वाहनांवर दगड मारणं हा कसला संवाद?राज्य सरकारच्या मिळमिळीत भूमिकेमुळं महाराष्ट्र झुकला, असा अर्थ कर्नाटकाकडून काढला जातोय. पण राज्यावर आणि राज्याच्या अस्मितेवर असेच हल्ले होत राहिले, तर कधीही कुणापुढं न झुकणारा महाराष्ट्र यापुढं शांत बसणार नाही, असा इशारा कर्नाटक सरकारला रोहित पवार यांनी दिला आहे.
संवादातून मार्ग काढता येतो, पण वाहनांवर दगड मारणं हा कसला संवाद?राज्य सरकारच्या मिळमिळीत भूमिकेमुळं महाराष्ट्र झुकला, असा अर्थ कर्नाटकाकडून काढला जातोय. पण राज्यावर आणि राज्याच्या अस्मितेवर असेच हल्ले होत राहिले, तर कधीही कुणापुढं न झुकणारा महाराष्ट्र यापुढं शांत बसणार नाही.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 6, 2022
Your email address will not be published. Required fields are marked *

Article Tags:
news