०६ डिसेंबर २०२२
शिवसेना नेमकी कुणाची? या प्रश्नाभोवती राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. पण, आता या सत्तासंघर्षावर पुढील वर्षीच सुनावणी होणार आहे. शिवसेनेनं लवकरात लवकर सुनावणी घेण्यास विनंती केली पण सुप्रीम कोर्टाने स्पष्ट नकार दिला आहे. या प्रकरणावर आता १० जानेवारीला सुनावणी होणार आहे.
निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हं गोठवलं. शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांना वेगळी नावे आणि चिन्हे दिली. त्यानंतर ठाकरे गटकडून शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्रत ठरवण्यासंबधी याचिका दाखल केली होती. याच 16 आमदारांना अपात्रतेच्या संदर्भात २९ नोंव्हेंबरला न्यायालयात सुनावणी होणार होती. परंतु ही सुनावणी लांबणीवर पडली होती. न्यायमूर्ती कृष्ण मुरारी सुट्टीवर असल्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती.दरम्यान हीच सत्तासंघर्षाची सुनावणी १० जानेवारीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. यासंबधीचा मुख्य युक्तिवाद १० जानेवारीला होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
Your email address will not be published. Required fields are marked *

Article Tags:
news