१२ डिसेंबर २०२२
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात वर्षभरापासून आर्थर रोड तुरुंगात असलेले अनिल देशमुख यांना दिलासा मिळाला आहे. तब्बल १३ महिन्यानंतर त्यांना जामीन मंजूर झाला. एक लाखांच्या जातमुचलक्यावर मुंबई हायकोर्टाने अनिल देशमुख यांना जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे लवकरच अनिल देशमुख तुरूंगाबाहेर येतील.
Your email address will not be published. Required fields are marked *
Article Tags:
news