Sunday, March 15, 2026
HomeBusinessराज्यसभेसाठी भाजपाची उमेदवार यादी जाहीर, विनोद तावडे, रामदास आठवलेंसह 'या' दोन नव्या...

राज्यसभेसाठी भाजपाची उमेदवार यादी जाहीर, विनोद तावडे, रामदास आठवलेंसह ‘या’ दोन नव्या चेहऱ्यांना संधी Maharashtra Marathi News | BJP’s record of candidates for Rajya Sabha introduced, Vinod Tawde, Ramdas Athawale and these 4 individuals have been given an opportunity

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाने आपल्या ४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भाजपाने पक्षाचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. तावडे यांच्यासह केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनाही भाजपाने पुन्हा एकदा राज्यसभेवर संधी दिली आहे. या दोन प्रमुख नेत्यांबरोबरच माया चिंतामण इवनाते आणि रामराव वडकुते यांनाही पक्षाने राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे.

महाराष्ट्र विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपाला राज्यसभेवर चार उमेदवार पाठवण्याची संधी होती. त्यानुसार भाजपाने आपल्या ४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपाने जाहीर केलेल्या उमेदवारांपैकी विनोद तावडे यांच नाव सुरुवातीपासूनच निश्चित होतं. तसेच अपेक्षेप्रमाणे त्यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. विनोद तावडे  यांच्या प्रमाणेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं नावही उमेदवारीसाठी निश्चित मानलं जात होतं. तसेच भाजपाने त्यांनाही आपल्या कोट्यामधून पुन्हा एकदा संधी दिली आहे.

मात्र राज्यसभेसाठी आपल्या कोट्यामधील इतर दोन जागांसाठी उमेदवारी देताना भाजपाने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. भाजपाने या दोन जागांसाठी धक्कातंत्राचा वापर करत माया चिंतामण इवनाते आणि रामराव वडकुते या चर्चेत नसलेल्या चेहऱ्यांनी संधी दिली आहे. 

दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ५ मार्च आहे. तर या निवडणुकीसाठी १६ मार्च रोजी मतदान होणार असून, त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी होणार आहे. 

Suhas
Suhashttps://onlinemaharashtra.com/
Suhas Bhokare is a journalist covering News for https://onlinemaharashtra.com/
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments