राज्यपालांवर नुपूर शर्माप्रमाणेच कारवाई करा; उदयनराजे भोसले यांची मागणी

Written by

१३ डिसेंबर २०२२
नुपूर शर्माच्या बाबतीत तात्काळ कारवाई करण्यात आली तशीच कारवाई राज्यपालांंवर करण्यात यावी, अशी मागणी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. राज्यपालांविरोधात पुण्यात बंदची हाक दिली होती. त्यात उदयनराजे भोसले सहभागी झाले होते. यावेळी ते बोलत होते.
उदयनराजे म्हणाले की, आजचा मोर्चा पाहून सर्वांना समजून घ्यायला हवं की, साडेतीनशे वर्षानंतरही युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचा मोठा आदर पाहायला मिळतो. काहीही कारण नसताना शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्यं करतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान व्हायला हवा, हे सांगण्याची गरज पडते यापेक्षा मोठी शोकांतिका नाही. याआधी मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. यात पक्षीय राजकारण नाही. मात्र वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजप प्रवक्त्या नूपूर शर्मावर पक्षातून निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्यानंतर अशी कोणतीही कारवाई झाली नाही. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांच्याबाबत ही कारवाई का झाली नाही, असा प्रश्न उपस्थित करत नुपूर शर्माप्रमाणेच कारवाई व्हायला हवी, अशी मागणी उदयनराजे यांनी केली.
 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares