रस्ता देत नाही तर हेलिकॉप्टरसाठी अर्थसहाय्य द्या; माजी सैनिकाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र

Written by

१६ डिसेंबर २०२२
अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील सालवड येथे खराब रस्त्याच्या मागणीसाठी एका माजी सैनिकाने गावात रस्ता होत नसल्याने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हेलिकॉप्टरसाठी अर्थसाह्य करण्याची मागणी केली आहे. तालुक्यातील हनुमान वस्तीवर अनेक वर्षांपासून मागणी करूनही रस्ता होत नसल्याने वैतागलेल्या दत्तू भापकर या माजी सैनिकाने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय.

गावाला तुम्ही रस्ता देऊ शकत नसाल तर आता हेलिकॉप्टरच द्या.अशा आशयाची अजब मागणी गावकऱ्याने केली आहे. सालवडगाव पासून दोन किलोमीटर अंतरावर साडेतीनशे लोक असलेल्या हनुमान वस्तीवर जाण्यासाठी साधा रस्ता आहे. मात्र पावसाळ्यात या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था होते. तहसीलदारांकडे वारंवार मागणी करूनही रस्ता होत नाही. त्यामुळे वैतागलेल्या भापकर यांनी मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहीत हेलिकॉप्टर खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्याची मागणी केली आहे.
 
Your email address will not be published. Required fields are marked *

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares