या  शाळा कॉलेज 1 मार्चपासून सुरु होणार..

Written by

या  शाळा कॉलेज 1 मार्चपासून सुरु होणार..
सामाजिक न्याय विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या दिव्यांगांच्या  शाळा व कर्म शाळा कोविड विषयक सर्व नियमांचे पालन करून येत्या 1 मार्च पासून सुरू करण्यात येत आहेत. महापालिका क्षेत्रात महापालिका आयुक्त व जिल्हा स्तरावर जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून शाळा सुरू केल्या जातील, अशी माहिती मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. 
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यात चालविल्या जाणाऱ्या दिव्यांग शाळा व कार्यशाळा आदी येत्या एक मार्चपासून शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयास अनुसरून सुरूकरावेत अशी माहिती धनंजय मुंडे यांनी विभागाला दीली आहे .
‘या’ परीक्षा का घेता? शिक्षक संघटना आक्रमक, ठराव रद्द करण्याची मागणी👇👇
महानगरपालिका क्षेत्रात महापालिका आयुक्त ,अन्य जिल्हा स्तरावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व जिल्हा परिषद प्रशासनाशी समन्वय साधून शालेय शिक्षण विभागाच्या 20 जानेवारी 2022 रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे दिव्यांग शाळा सुरू करण्याबाबतचे शासन परिपत्रक जारी करण्यात आलं होतं. 
दहावी बारावी बोर्ड परीक्षेसाठी एका वर्गात …विद्यार्थी! मुख्याध्यापकांना द्यावे लागणार हमीपत्र 👇👇
राज्यात सामाजिक न्याय विभागामार्फत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष शाळा व कार्यशाळा चालवल्या जातात. या शाळांची देशात सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. दिव्यांग व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती सामान्य व्यक्तीच्या तुलनेत कमी  त्यामुळे कोविड संसर्गाच्या काळात या शाळा बंद होत्या.
बोर्डाच्या  परीक्षेसाठी घाई नको…. 👇👇
आता 1 मार्चपासून या शाळा कोविड विषयक नियमांचे पूर्णपणे पालन करून सुरू करण्यात येत असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

Article Tags:
· ·
Article Categories:
Education

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares