..या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर
: नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (एनटीए) वतीने डिसेंबर २०२० आणि जून २०२१ च्या ‘यूजीसी नेट’ परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. देशभरातील सुमारे १२ लाख ६६ हजार ५०९ उमेदवारांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील सुमारे सहा लाख ७१ हजार २८८ उमेदवारांनी परीक्षा दिली आणि त्यातील केवळ ७.८ टक्के उमेदवार सहायक प्राध्यापक आणि ज्युनिअर रिसर्च फेलोशिपसाठी पात्र ठरले आहेत.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्यावतीने यूजीसी नेट’ परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत आयोजित करण्यात येते. नोव्हेंबर २०२१ ते जानेवारी २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता चाचणी ( exists R) परीक्षेचा निकाल ‘एनटीए’न जाहीर केला आहे.
यात उत्तीर्ण झालेल्या पात्र ठरलेल्या उमेदवारांची देशभरातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापक आणि ज्युनिअर रिसर्च फेलोशिपसाठी निवड केली जाते.