या जिल्ह्यात बोर्डाची २२२ परीक्षा केंद्रे
बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरू झाल्या असून चार मार्चपासून लेखी परीक्षा सुरू होणार आहे. शिक्षण विभागाने या परीक्षेचे नियोजन सुरू केले असून, जिल्ह्यात २२२ केंद्रांवर परीक्षा होईल. जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेसाठी ३७ हजार ५०८ विद्यार्थी बसणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
हॉलतिकीट download करताना या गोष्टी बरोबर आहेत का नाही हे पहा अन्यथा परीक्षेस बसता येणार नाही 👇👇
मार्च २०२० पासून कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाइन झाले होते. त्या कालावधीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. त्यानंतर कोरोनाचा संसर्ग कमी झाला होता.
दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द जाणून घ्या सत्य👇👇
मात्र, मागील काही महिन्यांत कोरोनाचा कहर सुरू झाल्याने राज्यात पुन्हा शालेय शिक्षण ऑनलाइन झाले होते. या पार्श्वभूमीवर दहावी व बारावीच्या परीक्षा ऑनलाइन होणार का, अशी शंका उपस्थित होत असतानाच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे.
त्यामुळे या परीक्षा ऑफलाइनच होणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण विभागाने केल्यानंतर त्या वेळापत्रकानुसार घेण्याचे नियोजन सुरू झाले आहे. यंदा शैक्षणिक वर्षाचे वर्ग १५ जूनला ऑनलाइन सुरू करण आले. मात्र, गेल्या दीड महिन्यापासून कोरोनाचा विळखा याने शाळा व महाविद्यालयांचे वर्ग ऑफलाइन सुरू झाले.