या’ कारणामुळे शाळा ,कॉलेज तात्काळ सुरु करणे गरजेचे, केंद्राचे आदेश
करोना प्रतिबंध निर्बंध हळूहळू शिथिल होऊ लागल्यानंतर लोकांची दिनचर्या आता सामान्य होऊ लागली आहे. अनेक ठिकाणचे निर्बंधही हटवण्यात आले आहेत. अनेक राज्यांनी शाळाही सुरू केल्या आहेत
महाविद्यालयेही सुरू होत आहेत. मात्र अनेक राज्यांमध्ये शाळा सुरू असूनही पालक मुलांना शाळेत पाठवण्यास टाळाटाळ करत आहेत. करोना व्हेरिएंटचा नवीन प्रकार आल्यास पुन्हा एकदा बंदी येईल आणि शाळेत न जाण्याने मुलांच्या विकासावर परिणाम होऊ नये अशी चिंता व्यक्त केली जात आहे.
दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द जाणून घ्या सत्य👇👇
राज्यात मुलांच्या शाळा तातडीने सुरू करण्यात याव्यात. मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी शाळा उघडणे आवश्यक असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. त्यामुळे राज्यांनी या कामात कोणतीही हलगर्जीपणा दाखवू नये आणि तातडीने शाळा सुरू करण्याची व्यवस्था करावी असे स्पष्ट करण्यात आले आहे.
देशभरातील शाळेत शिकणारी मुले आणि त्यांच्या पालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. देशातील करोना परिस्थिती नियंत्रणात असताना अनेक राज्यातील शाळा सुरु झाल्या आहेत. तरी काही राज्यांनी अजून ऑनलाइन शिक्षणाला महत्व दिल्याचे दिसते. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्य सरकारांना शाळा सुरु करण्यासंदर्भातील महत्वाचे निर्देश दिले आहेत.

Article Categories:
Education