मोरया गोसावी क्रीडांगण दुरुस्तीसाठी तब्बल दोन वर्षापासून काम बंद

Written by

१८ नोव्हेंबर २०२२

पिंपरी
पिंपरी चिंचवड महापालिकेचे मोरया गोसावी क्रीडांगण दुरुस्तीसाठी तब्बल दोन वर्षापासून बंद आहे . क्रीडांगण नूतनीकरणाचे काम संथ गतीने सुरू असल्याने ज्येष्ठ नागरिक , महिला , पुरुष , लहान मुले तसेच , खेळाडूंची गैरसोय होत आहे . हे दुरुस्तीचे काम गेल्या दोन वर्षांपासून कासव गतीने सुरू आहे त्यासाठी क्रीडांगण बंद ठेवण्यात आले आहे . जॉगिंग ट्रॅकचे काम रखडले आहे . मैदानात ठिकठिकाणी पेव्हिंग ब्लॉक व राडारोडा पडला आहे . मैदानातील स्वच्छतागृहाचे काम अर्धवट स्थितीत आहे . सीमा भिंत व त्यावरील लोखंडी जाळ्या तुटल्या आहेत.
दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण न झाल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत . काम अर्धवट असतानादेखील या मैदानावर शालेय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे . स्पर्धेदरम्यान मैदानावर खेळाडूंसाठी आवश्यक सुविधा नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे . मैदानावरील दुरुस्तीचे कामे तातडीने पूर्ण करून ते सर्वांसाठी खुले करावे , अशी मागणी मनसेच्या विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष हेमंत डांगे यांनी महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याकडे केली आहे . अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे .
 
Your email address will not be published. Required fields are marked *





source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares