Saturday, March 14, 2026
HomeNewsMartahiमॅट्रिमोनिअल साईटवरून ओळख, महिलेची 60 लाखांची फसवणूक:विवाहाचे आमिष दाखवून चोरट्याने केली आर्थिक...

मॅट्रिमोनिअल साईटवरून ओळख, महिलेची 60 लाखांची फसवणूक:विवाहाचे आमिष दाखवून चोरट्याने केली आर्थिक फसवणूक

मॅट्रिमोनिअल साईटवरून ओळख, महिलेची 60 लाखांची फसवणूक:विवाहाचे आमिष दाखवून चोरट्याने केली आर्थिक फसवणूक
विवाहविषयक संकेतस्थळावर झालेल्या ओळखीतून एका महिलेची ५९ लाख ३७ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी एका अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार ४४ वर्षीय महिला पुणे शहरातील वडगाव शेरी, नगर रस्ता येथे राहते. तिने काही वर्षांपूर्वी एका विवाहविषयक संकेतस्थळावर नावनोंदणी केली होती. त्यानंतर एका चोरट्याने तिच्याशी संपर्क साधून लग्नाची इच्छा व्यक्त केली आणि तिला आपल्या जाळ्यात ओढले. या चोरट्याने वेगवेगळ्या कारणांखाली महिलेकडून पैसे मागण्यास सुरुवात केली. महिलेने कोणतीही खातरजमा न करता, गेल्या दीड वर्षात वेळोवेळी चोरट्याच्या खात्यात सुमारे ५९ लाख ३७ हजार रुपये जमा केले. जेव्हा महिलेने लग्नाबाबत विचारणा केली, तेव्हा चोरट्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. त्याने महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली आणि पैसे मिळाल्यानंतर आपला मोबाइल क्रमांक बंद केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दाखल केली. सहायक पोलीस निरीक्षक जगदाळे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. विवाहविषयक संकेतस्थळांवरून होणाऱ्या फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याने महिलांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. अनोळखी व्यक्तीने आमिष दाखविल्यास त्याची खातरजमा करावी, असेही सांगण्यात आले आहे. पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने चोरी पीएमपी प्रवासी महिलेच्या गळ्यातील ७५ हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविल्याची घटना बाजीराव रस्त्यावर घडली. याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला सिंहगड रस्ता भागात राहायला आहेत.. त्या स्वारगेट ते पिंपरी या मार्गावरील बसने प्रवास करत होत्या. बाजीराव रस्त्यावर चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविल्याची घटना घडली. पोलीस कर्मचारी भोसले तपास करत आहेत.

Suhas
Suhashttps://onlinemaharashtra.com/
Suhas Bhokare is a journalist covering News for https://onlinemaharashtra.com/
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments