मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट

Written by

१६ नोव्हेंबर २०२२
राज्यात वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युतीची चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आंबेडकरांची भेट घेतली. मुंबईतील राजगृह येथे प्रकाश आंबेडकरांची भेट घेतल्यानंतर एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी या भेटीत काय झालं हे सांगितलं.
एकनाथ शिंदे म्हणाले, मी प्रकाश आंबेडकर यांची सदिच्छा भेट घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पवित्र्य झालेली ही वास्तू पाहिली. यात कोणतंही राजकारण नाही. कृपया गैरसमज करून घेऊ नका. ही निव्वळ सदिच्छा भेट होती. एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, राजगृहाची ही इमारत बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून उभी राहिली आहे. बाबासाहेबांनी आर्किटेक्चरची मदत न घेता कोणत्याही खांबाशिवाय ही इमारत उभी केली. राजगृहमध्ये बाबासाहेबांच्या वाचनाची खोली, अभ्यासाचा टेबल, बसण्याची खुर्ची, सर्व पुस्तकं आणि इतर सर्व बाबासाहेबांच्या वापरातील वस्तू पाहिल्या. त्या आजही जशाच्या तशा आहेत. हा आपला ऐतिहासिक ठेवा आहे. तो आज मुख्यमंत्री म्हणून मला पाहायला मिळाला असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
 
Your email address will not be published. Required fields are marked *





source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares