०८ डिसेंबर २०२२
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसेही पक्षाचा प्रचार करताना दिसत आहे. मात्र एकनाथ खडसेंनी आता प्रचारात न उतरता आराम करावा. आता त्यांचे वय झाल्याची अशी टीका भाजपा नेते गिरीश महाजनांनी केली होती. गिरीश महाजनांच्या टीकेला एकनाथ खडसेंनी प्रत्युत्तर दिले आहे. मी कुणाचे पाय धरून किंवा बोट धरून पाय चाटून मोठा झालेलो नाही. कुणाच्या मागे उभा राहून टिव्हीवर माझ चित्रं आलं पाहिजे, अशा स्वरूपाचं काम मी कधीही केलेलं नाही, अशी टीका एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर केली आहे.
गिरीश महाजन यांना आता माझी भीती वाटायला लागली आहे. म्हणून ते माझा प्रचार थांबवा म्हणत आहेत. मी मरेपर्यंत राजकारणी राहणार आहे. जोपर्यंत माझा आवाज बुलंद आहे, तोपर्यंत मी राजकारणात सहभागी राहणार आहे. मी थकणारा नाही. जनतेचे प्रश्न घेऊन मी संघर्ष करणार आहे, लढणार आहे.
मी कुणाचे पाय धरून, बोट धरून किंवा पाय चाटून मोठा झालेला माणूस नाही. कुणाच्या मागे उभे राहून टिव्हीवर माझा चेहरा दिसला पाहिजे, असे मी कधीही केले नाही. मी कुणाच्या मागे उभा राहिलो नाही. लोक माझ्या मागे उभे राहिले आणि ते टिव्हीवर झळकले. त्यांची लाचारी असते. मी लाचार नाही. मी विश्वासाने जगणारा माणूस आहे. त्यामुळे मी लढत राहणार, असे एकनाथ खडसेंनी ठणकावून सांगितले. आहे.
Your email address will not be published. Required fields are marked *

Article Tags:
news