दि. १९/०१/२०२३
पिंपरी
पिंपरी : नाशिक पदवीधर निवडणुकीत तांबे पिता पुत्रांनी काँग्रेसला धोका दिल्याचं चित्र आहे. यावरून अशोक चव्हाण यांनी चिंता व्यक्त केलीये.काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनीही नाशिकमधील घटनेबाबत गांभीर्य व्यक्त केलं आहे.
काही उमेदवारांनी आधीच इच्छा व्यक्त केली असती तर तिकिट देत असतानाच हा विषय टाळता आला असता.. मात्र त्यावेळेला ते घडलं नाही.विधान परिषदेतही मतं फोडाफोडीचं काम भाजपनेच केलं आहे. माणसं फोडून मतं घ्यायचं हा प्रयोग मागच्या विधान परिषद निवडणूकीत स्पष्ट झाला. नाशिकमध्येही तोच प्रयोग केला गेला. त्यामुळे आता नाशिकचा निर्णय घेताना विचारपूर्वक घ्यावा, असाच प्रयत्न आहे. असही अशोक चव्हाण म्हणालेत.
नाशिकच्या निवडणुकीत कुणाला पाठिंबा द्यायचा, यासाठी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा होणार आहे. शिवसेनेनी एका जागेची मागणी केली होती. त्यानुसार नाशिकच्या जागेवर त्यांनी क्लेम केला आहे. त्यामुळे अंतिम निर्णय घेताना त्यांनाही विश्वासात घेणार आहोत. महाविकास आघाडी म्हणूनच हा निर्णय जाहीर केला जाईल.एकूणच नाशिक आणि नागपूर पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीचा पाठिंबा नेमका कुणाला असेल यावरून सध्या तरी गोंधळाची स्थिती पहायला मिळतेय. माणसं फोडून मतं घेणं हीच भाजपची रणनीती राहिलेली आहे. मागील विधान परिषद निवडणुकांवेळी ती जास्त स्पष्ट दिसून आली. आता नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीतही तेच दिसून आलेलं आहे
Your email address will not be published.

Article Tags:
news