माजी महापौर किशोरी पेडणेकर दादर पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी हजर

Written by

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०१ नोव्हेंबर २०२२
माजी महापौर किशोरी पेडणेकर सध्या भाजपा नेते किरीट सोमैया यांच्या रडारवर आहेत. किशोरी पेडणेकर यांनी एसआरए प्रकल्पात घोटाळा केल्याचा गंभीर आरोप सोमैया यांनी केला आहे. याचे कथित पुरावे किरीट सोमैयांनी सादर केले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी किशोरी पेडणेकर दादर पोलीस ठाण्यात हजर झाल्या आहेत.
झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात सदनिका देण्याच्या नावाखाली रक्कम घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पेडणेकर यांच्यावरही आरोप करण्यात आले होते. याप्रकरणी किरीट सोमैयांनी दादर पोलीस ठाण्यात पेडणेकर यांच्या चौकशीची मागणी केली होती.या चौकशीसाठी पेडणेकर दादर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.
 
Your email address wi

source

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares