Friday, March 6, 2026
HomeNewsMartahiमहिलेची हॉटेल आरक्षणाच्या नावाखाली 7 लाखांची फसवणूक:सायबर चोरट्यांविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल

महिलेची हॉटेल आरक्षणाच्या नावाखाली 7 लाखांची फसवणूक:सायबर चोरट्यांविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल

महिलेची हॉटेल आरक्षणाच्या नावाखाली 7 लाखांची फसवणूक:सायबर चोरट्यांविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल
नाशिकमधील हॉटेल खोली आरक्षित करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी एका महिलेची ७ लाख २३ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अज्ञात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शिवाजीनगर भागात राहणाऱ्या ५३ वर्षीय महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे. सायबर चोरट्यांनी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. त्यांनी एका नामांकित ऑनलाइन बुकिंग संस्थेतून बोलत असल्याची बतावणी केली. चोरट्यांनी महिलेला नाशिकमध्ये आरक्षित केलेल्या हॉटेलच्या तारखेत बदल करण्याची ऑफर दिली. त्यानंतर, त्यांनी महिलेच्या मोबाइलवर व्हिडिओ कॉलिंगद्वारे संपर्क साधला आणि मोबाइल क्रमांक तसेच इतर माहिती मिळवली. चोरट्यांनी महिलेचा मोबाइल क्रमांक हॅक करून तो बँक खात्याशी जोडला. यानंतर, त्यांनी महिलेच्या बँक खात्यातून ७ लाख २३ हजार रुपये परस्पर स्वतःच्या खात्यात हस्तांतरित केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिसांत तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमर काळंगे या प्रकरणाचा तपास करत आहेत. क्रेडिट कार्ड देण्याच्या आमिषाने फसवणूक दरम्यान, क्रेडिट कार्ड देण्याच्या आमिषाने एका व्यक्तीची २ लाख १६ हजार ३९३ रुपयांची फसवणूक झाल्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तक्रारदाराच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संपर्क साधला. त्यांनी एका नामांकित बँकेचे क्रेडिट कार्ड देण्याचे आमिष दाखवले आणि एक लिंक उघडण्यास सांगितले. ही लिंक उघडताच चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यातून २ लाख १६ हजार रुपये काढून घेतले. गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष तसेच, गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून एका तरुणाची ३ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.सायबर चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर एक लिंक पाठवली होती. या लिंकद्वारे गुंतवणुकीवर आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून चोरट्यांनी तरुणाची ३ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक केली.

Suhas
Suhashttps://onlinemaharashtra.com/
Suhas Bhokare is a journalist covering News for https://onlinemaharashtra.com/
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments