महिला बचत गटांना कर्ज वाटपाचा कार्यक्रम पुर्वाताई वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

Written by

पिंपळगाव (खडकी ) ता.आंबेगाव, जि.पुणे येथे अनुसया महिला उन्नती केंद्र, मंचर यांच्या विशेष प्रयत्नातून पुणे जिल्हा मध्य.सह.बँक व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नती अभिमान (उमेद)-पंचायत समिती आंबेगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने महिला बचत गटांना कर्ज वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच यावेळी मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित निबंध वकृत्व स्पर्धा व बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाला उपस्थित राहून राष्ट्रीय ग्रामिण विकास केंद्राच्या संचालिका पुर्वाताई वळसे पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अरुणाताई थोरात, जेष्ठ नेते बाबुरावदादा बांगर, आंबेगाव तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुषमाताई शिंदे, युवती अध्यक्षा अक्षदा शिंदे, माथाजी पोखरकर, तुकाराम बांगर, शिवाजीराव पोखरकर, सरपंच दिपक पोखरकर, खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष रामनाथ बांगर, अरूण बांगर, ज्योतीताई पोखरकर, सुनिताताई बांगर, अर्चनाताई राक्षे, शैलाताई घेवारे, सुजाताताई पोखरकर, विक्रांत पोखरकर, विठ्ठल बांगर, धनेश पोखरकर, संदीप बांगर, पप्पू कामठे, कल्याणआबा शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Article Tags:
Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published.

Shares