महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांचे संयुक्त विद्यमाने जुन्नर तालुक्यातील शाखांकडून बचत गट शिबीराचे आयोजन

Written by

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे पश्चिम विभाग यांचे संयुक्त विद्यमाने जुन्नर तालुक्यातील शाखांच्या वतीने जुन्नर येथे बचत गटांसाठी कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष बँक ऑफ महाराष्ट्राचे कार्यकारी संचालक ए बी विजय कुमार, प्रमुख पाहुणे एस. वाय. माळी गट विकास अधिकारी पंचायत समिती जुन्नर, पुणे पश्चिम विभागाचे प्रमुख जतीन देसाई , राहुल वाघमारे व उषा अभंग (तालुका अभियान व्यवस्थापक,जुन्नर) हस्ते बचत गटांना मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले.
यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बचत गटांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी ए.बी विजय कुमार यांनी बचत गटाच्या महिलांशी संवाद साधून बचतीचे महत्व व महिलांमधील कलागुणांचा योग्य तो वापर करून आर्थिक प्रगती साधण्याचे आवाहन केले. राहुल वाघमारे म्हणाले की, बचतगटांनी महिलांच्या जीवनात बरेच बदल आणले आहेत आणि बँक ऑफ महाराष्ट्र या गटांच्या उत्थानासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल. पुणे जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर यांनीही बचत गटांना मार्गदर्शन केले. एस.वाय माळी, गट विकास अधिकारी पंचायत समिती जुन्नर यांनी महिलांना छोट्या व्यवसायातून मोठ्या व्यवसायाकडे यशस्वी वाटचाल करण्यासाठी पंचायत समिती जुन्नर सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या बचत गट मेळाव्यास महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान कर्मचारी वर्गाचे विशेष सहकार्य लाभले.

या मेळाव्यास बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे पश्चिम विभागाचे उप अंचल प्रबंधक अमित गोयल, मुख्य प्रबंधक संजय शर्मा तसेच पंचायत समिती जुन्नर (उमेद अभियान) तालुका अभियान व्यवस्थापन कक्षातील प्रभाग समन्वयक मधुकर ठोंगिरे, रविंद्र आल्हाट,सागर ठीकेकर, सुनिता सुवर्णकार,विद्या बांबळे,निर्मला गाढवे, भारती आचार्य (बँक सखी) बँक ऑफ महाराष्ट्रच्या जुन्नर, मढ, ओतूर, पिंपळवंडी, नारायणगाव इ. बँकेचे शाखा प्रबंधक पवन बोराडे, नितीन वाने, कांचन कुमार आचार्य, विशाल म्हस्के, अधिकारी जसप्रीत सिंग, स्वप्निल चोरे, वरून राणा, बलप्रीत सिंग, राहुल राठोड, रोहित जोशी, राकेश कुमार व इतर बँक कर्मचारी उपस्थित होते. या मेळाव्यात बचत गटांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आणि त्यांनी उमेद अभियानाचे आणि बँक ऑफ महाराष्ट्रच्या प्रयत्नांचे, सेवांचे कौतुक केले. कार्यक्रमात एकूण 234 बचत गटांना एकुण रुपये 3 कोटी 42 लाख या प्रमाणे कर्जमंजुरी पत्रांचे वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल सर्व MSRLM टीमचे कौतुक करण्यात आले.

Article Categories:
All News · Braking News · News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Shares