०६ डिसेंबर २०२२
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणखी चिघळला आहे. बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या सहा ट्रकवर दगडफेक करत तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे टोलनाक्यावर वातावरण चिघळलं असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
कन्नड रक्षण वेदिके संघटनेचे नारायण गौडा हे बेळगाव दौऱ्यावर आहेत. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावमध्ये रास्ता रोको आंदोलन केलं. हिरबागेवाडी येथील टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या सहा वाहनांवर या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली आहे. या प्रकारानंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांसह नारायण गौडा यांना ताब्यात घेतलं आहे. या कारवाईनंतर कन्नड रक्षण वेदिकेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
Your email address will not be published. Required fields are marked *

Article Tags:
news